बद्दल
स्थान: मुंबई -बीड महामार्गावर नगर पासून ३६ मैलावर.
विशेष: सर्वांग सुंदर ३॥ फूट उंचीची, शिव मध्ये असलेली दत्त मूर्ती.
मुंबई-बीड राजमार्गावर नगरपासून ३६ मैलांवर आष्टी हे बीड जिल्ह्यातील तालुक्याचे गाव आहे.
माघ वद्य प्रतिपदा शके १८८८ शनिवार दि. २५/२/१९६७ रोजी येथे श्रीदत्तमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. ही मूर्ती जयपूरहून मुद्दाम तयार करवून आणली आहे. ती शिवदत्ताची म्हणजे त्रिमुखांपैकी मधले मुख शंकराचे असलेली आहे. मूर्ती ३॥ फूट उंच, शुभ्र संगमरवरी पाषाणाची असून, ध्यान अत्यंत नयनमनोहर व विलोभनीय असे आहे.
या मंदिराची पूजा-अर्चादी सर्व व्यवस्था श्रीदत्त अवधूत परंपरेतील प. पु. श्री. रघुनाथ महाराज कालकुंद्रीकर यांच्या पत्नी प. पु. श्रीमती शामला रघुनाथराव कालकुंद्रीकर ( विश्वस्त ) यांच्या देखरेखेखाली सदगुरु सेवेकरी मंडळ व शिष्यगण यांच्या मार्फत कार्यरत आहे.
परमपुज्य श्री. रघुनाथ महाराज कालकुंद्रीकर व सौ. शामला रघुनाथ कालकुंद्रीकर यांचा
अल्प परिचय
-
परमपुज्य श्री रघुनाथ महाराज कालकुंद्रीकर यांचे कुळात श्री दत्त महाराजांची सेवा अनेक पिढ्यांपासून चालत आली आहे. याचा संदर्भ गुरुचरित्रात सापडतो. --- नारायण स्वामी व जलवाहक (पाणक्या) कालकुंद्रीकर यांची कथा --- नारायण स्वामींच्या आशिर्वादाने कालकुंद्रीकर घराणे नावलौकिक मिळवून मोठे झाले.
-
परमपुज्य रघुनाथ महाराज हे कर्नाटक सरकारच्या सहकार खात्यात शासकीय सेवेत होते.-- दत्त महाराजांच्या आज्ञेने त्यांनी नोकरी सोडून पुर्णवेळ श्री सेवेत व्यतीत करण्याचे ठरविले व त्या प्रमाणे श्री क्षेत्र गाणगापूर, नरसोबाची वाडी, कोल्हापूर, आळंदी वगैरे क्षेत्री सद्गुरु सेवेत आपला काळ घालावीत असताना सद्गुरुंच्या आज्ञेने ते आष्टी गावी सन १९६६ साली आले.
-
आष्टी क्षेत्री दत्त मंदिराची स्थापना करुन त्यांनी दत्त संप्रदायाच्या वृद्धीचे हेतूने मंदिरात त्रिकाल आरती सुरू केली. श्री दत्त जयंती, श्री गुरू पौर्णिमा, श्री मंदिर वर्धापन दिन हे उत्सव मोठया प्रमाणात तर श्री राम जन्म , श्री हनुमान जन्म हे उत्सव अल्प प्रमाणात साजरे करण्यास सुरूवात केली.
-
त्याच्या या अध्यात्मिक प्रवासात परमपुज्य गुरूमाऊली यांनी त्यांना मोलाची साथ दिली.
-
परमपुज्य गुरूमाऊली ( वहीनी) या मुधोळ गावच्या वैद्य परिवारातील श्री दामोदर पंत व आई गंगाबाई यांचे कन्या रत्न ---- तीन भावांची लाडकी बहीण ---- वैद्य घराण्यात ही अध्यात्मिक वातावरण सुरूवाती पासूनचे.
-
सुरेशराव व मनिषा ही अपत्ये
-
परमपुज्य गुरूमाऊलींनी श्री क्षेत्र नरसोबाची वाडी येथे परमपुज्य महाराजांचे सोबत श्रींची खडतर सेवा केली ---- वाडी येथील दैनंदिन कार्यक्रमात सहभाग घेत असतानाच पहाटे उठून संपूर्ण प्रदक्षिणा मार्ग झाडून स्वच्छ करणे, दुपारची आरती झाल्यावर प्रदक्षिणा मार्ग व घाट नदी पात्रातून पाणी आणून रोज धुणे वगैरे सेवा त्या करीत. या काळात परिवाराची गुजराण महाराज मधुकरी मागून करीत होते.
-
आष्टीला दत्त मंदिराची स्थापना केल्यावर महाराजांनी शिष्य परिवार वाढविण्यास सुरूवात केली. या शिष्य परिवाराला मायेची सावली देण्याचे कार्य परमपुज्य गुरूमाऊलींनी केले व त्या सर्व शिष्य व भक्त मंडळींच्या 'वहीनी' झाल्या.
-
परमपुज्य रघुनाथ महाराज दिनांक २८ ऑगस्ट १९९६ रोजी दत्त चरणी विलीन झाले. त्यानंतर पुढील २५ वर्षे परमपुज्य गुरूमाऊलींनी दत्त मंदिराची धुरा सांभाळली. या काळात मंदिराच्या वास्तू चा जिर्णोध्दार करीत असतानाच त्यांनी शिष्यवर्ग ही वृद्धींगत केला.
-
दिनांक १५ एप्रिल २०२१ रोजी गुरूमाऊली दत्त चरणी विलीन झाल्या.
-
प्रपंचात राहून ही विरक्त वृत्तीने सद्गुरु सेवा कशी करावयाची याचे उदाहरणच त्यांनी सर्वांना घालून दिले.
जीर्णोद्धार माहिती
परमपुज्य श्री. रघुनाथ महाराज कालकुंद्रीकर यांनी सन १९६६ मध्ये आपल्या पदस्पर्शाने आष्टी हे गाव पुनीत
केले. महाराजांनी त्यांच्या शिष्यवृंदासाठी, आष्टी ग्रामस्थ व भक्त मंडळींसाठी तेथे एक दत्त मंदिर स्थापिले. त्या
वेळेच्या परिस्थितीनुसार बांधण्यात आलेले मंदिर व श्री दत्त महाराजांचे गर्भगृहाला २०१९ मध्ये बावन्न वर्षे पुर्ण झाली. |
परमपुज्य महाराज सन १९९६ मध्ये श्री दत्तचरणी विलीन झाल्यानंतर श्री दत्त मंदिराची धुरा त्यांच्या पत्नी सौ. शामला रघुनाथ कालकुंद्रीकर (वहिनी) या संस्थेच्या अध्यक्षा या नात्याने वहात होत्या. |
श्री दत्त मंदिराच्या सभागृहाचे काम शासकीय निधीतून करण्यात आले परंतु त्यासोबतच परमपुज्य महाराजांची गर्भगृहाच्या जिर्णोद्धार करण्याची इच्छा वहिनींच्या मार्गदर्शनाखाली पुर्ण व्हावी असे आष्टीतील मान्यवर, ग्रामस्थ, सर्व शिष्यवृंद, हितचिंतक, दर्शनार्थी भाविक यांना वाटले त्यामुळे या सर्वांनी एक कमिटी स्थापन करून त्या कमिटी मार्फत सदरचे गर्भगृहाचे जिर्णोद्धाराचे काम तसेच त्या अनुषंगाने येणारी कामे २०१९ मध्ये पूर्ण केली |
-: आपले नम्र :-
श्रीमती नलिनी सुरेश कालकुंद्रीकर (अध्यक्षा, जिर्णोद्धार कमिटी)
आगामी कार्यक्रम
- Sun, Dec 08AshtiDec 08, 2024, 5:00 AM – Dec 15, 2024, 10:00 PMAshti, DATTA MANDIR, Datta Mandir Rd, Maliwada, Ashti, Maharashtra 414203, India